राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; मनसेचा हल्ला

मुंबई – राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. देशपांडे यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 17, 2021
संदिप देशपांडे म्हणाले की, राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार यांनी सुद्धा राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे त्यांचे लिखाण नक्कीच योग्य रस्ता दाखवेल असा सल्ला दिला होता.





