मनसे नेत्या रुपाली ठोंबरे संतापल्या म्हणाल्या,’कांबळे, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची’

पुणे : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असतानाच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण सुरु झाला आहे. मात्र यावर सुनील कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

व्हायरल झालेली ती ऑडिओ क्लिप माझी नाहीच, त्यात असणारा आवाज सुद्धा माझा नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असं स्पष्टीकरत भाजपचे आमदार सुनील कांबळे   यांनी दिलं आहे.आमदार कांबळे यांनी एका महिला अधिकाऱ्याला फोन केला होता. त्यावेळी शिवीगाळ करत असल्याची ऑडीओ क्लिप आज व्हायरल झाली होती.

याबाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि महापौर मुरलीधर मोहोळ काय कारवाई करणार असा सवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. 

काय आहे  रुपाली ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट

न्याय होणारच ! चुकीला माफी नाही म्हणजे नाही #share
भाजपाचा मस्ती चढलेला आमदार सुनील कांबळे पुणे मनपा कर्मचारीला आई बहिणीवर शिव्या देतो याची मस्ती मनसे महिला सेना #मन्सस्टाईलने उतरवनार
महिला आयोग व पुणे पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी
पुण्याचे महापौर Murlidhar Mohol पुण्याचे पालकमंत्री
Ajit Pawar यांनी तात्काळ गुन्हा नोंद करून योग्य कारवाई करत या मस्टलवाल आमदारांची मस्ती उतरवावी नाहीतर ….

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.