Dainik Prabhat
Monday, May 16, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

शरद पवारांवरील विखारी टीकेच्या वादात मनसेची उडी; केतकी चितळेबाबत राज ठाकरे म्हणाले…

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 4:46 pm
A A
शरद पवारांवरील विखारी टीकेच्या वादात मनसेची उडी; केतकी चितळेबाबत राज ठाकरे म्हणाले…

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियातील पोस्टमुळे सतत वाद आणि चर्चेत येत असते. केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तिच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर या विखारी टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रक काढून म्हटलं की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! pic.twitter.com/hnngbIwQaW

— Raj Thackeray (@RajThackeray) May 14, 2022


महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरण गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, असंही राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं.

 

Tags: controversy over vicious criticismketki chitalemnsraj thackeraysharad pawar

शिफारस केलेल्या बातम्या

केतकी चितळे प्रकरणात सुजात आंबेडकरांची उडी; म्हणाले,”अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर”
Top News

केतकी चितळे प्रकरणात सुजात आंबेडकरांची उडी; म्हणाले,”अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर”

1 hour ago
‘रुग्ण हक्क परिषद’ शरद पवारांना 3000 पत्र लिहिणार – उमेश चव्हाण
पुणे जिल्हा

‘रुग्ण हक्क परिषद’ शरद पवारांना 3000 पत्र लिहिणार – उमेश चव्हाण

15 hours ago
केतकी चितळेने शरद पवारांची माफी मागावी; नवनीत राणा यांचं आवाहन
Top News

केतकी चितळेने शरद पवारांची माफी मागावी; नवनीत राणा यांचं आवाहन

2 days ago
Ketaki Chitale Arrest: केतकी चितळेवर पोलीस ठाण्याबाहेर शाईफेक
Top News

Ketaki Chitale Arrest: केतकी चितळेवर पोलीस ठाण्याबाहेर शाईफेक

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

किशोरी पेडणेकर म्हणाल्या,”केतकीच्या कृतीमागे ‘कर्ता करविता’ कोणी वेगळाच…”

दिल्लीच्या रस्त्यांवर बुलडोझर चालवून भीतीचे वातावरण ; 60 लाखांहून अधिक लोक बेघर ?

केतकी चितळे प्रकरणात सुजात आंबेडकरांची उडी; म्हणाले,”अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर”

कॅलिफोर्नियाच्या चर्चमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी

भारताच्या या रेल्वे मार्गावर आजही ब्रिटिश राजवट आहे ! सरकारला दरवर्षी कर भरावा लागतो

चीनने बांधलेल्या विमानतळावर पंतप्रधान मोदी उतरलेच नाहीत

“वज़नदार ने हल्के को, बस…”; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

“उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण”; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

पुणे : ओढे-नाल्यांची सफाई झालीच नाही

पुणे : विद्यार्थ्यांनो विविध दाखले काढून ठेवा…

Most Popular Today

Tags: controversy over vicious criticismketki chitalemnsraj thackeraysharad pawar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!