मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या चौकशीच्या अगोदर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Mumbai: Maharashtra NavNirman Sena (MNS) leader Sandeep Deshpande detained by police as a precautionary measure. MNS chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate (ED) to appear before the agency, today. pic.twitter.com/4kIUATA6PK
— ANI (@ANI) August 22, 2019
सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचे ‘EDiot Hitler’ लिहिलेले टी-शर्ट परिधान केले आहेण दरम्यान, राज ठाकरे यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे सांगत राज यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अशा नोटिसांना मनसे भिक घालत नसल्याचा मनसेचा पवित्रा असला तरी सतर्कतेचा इशारा म्हणून मुंबईत चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.