पुणे – आमदारांना मिळणाऱ्या 2 कोटीच्या निधीत एक कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आमदारांना प्रतिवर्षी तीन कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळणार आहे.
2020-21 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषतात घोषित केल्यानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीत वाढ करण्यात आली आहे. 2020-21 आर्थिक वर्षापासून सर्व आमदारांना प्रतिवर्षी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
या कामांत शाळा खोल्या बांधकाम, अंगणवाडी, व्यायामशाळा, स्मशानभूमीची कामे, बस थांबा बांधकाम, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदी प्रकारच्या कामांचा समावेश आहे.