सोरतापवाडी (प्रतिनिधी) – नायगाव (ता.हवेली) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १ कोटी २७ लाख रुपयांचे विविध विकास कामांचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर ,पंचायत समितीच्या सदस्या कावेरी कुंजीर, रामदास चौधरी,पेठ गावचे सरपंच सुरज चौधरी,पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, निलेश खटाटे ,सनी चौधरी,रमेश मेमाने तुळशीराम चौधरी , देवराज चौधरी,प्रकाश गोळे ,उपअभियंता पी .जे. गवळी, संजय गीते, नलावडे ,कृष्णा आप्पा चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जि .प. शाळा मार्ग वस्ती दुरुस्ती,सिद्धार्थनगर येथील सभामंडप,अंतर्गत रस्ते, वितरण नलिका, भिल्ल वस्ती येथील अंतर्गत रस्ते, जन जीवन अंतर्गत कटकेवस्ती, आदर्श कॉलनी, मार्ग वस्ती येथे वितरण नलिका टाकने , बंदिस्त गटर लाईनचे काम इत्यादी कामाचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने नायगाव पेठ शिव रस्ता, सौर ऊर्जा प्रकल्प,पाणंद रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण, सभामंडप, नवीन ट्रान्सफॉर्मर इत्यादी कामा बाबत मदत करण्याचे आवाहन माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी आमदार अशोक पवार यांना केले. पवार यांनी गावच्या विकास कामांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले .आणि आमदार आपल्या गावी ही संकल्पना राबविणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन सरपंच गणेश चौधरी,उपसरपंच पल्लवी गायकवाड, विद्यमान सदस्य जितेंद्र चौधरी,उत्तम शेलार,दत्तात्रय बारवकर , कल्याणी हगवणे,बाळसाहेब गायकवाड, अश्विनी चौधरी, आरती चौधरी , संगीता शेलार, प्रियंका गायकवाड यांनी केले होते. तसेच संजय चौधरी,पंडित चौधरी, माया चौधरी , माजी उपसरपंच ज्ञानोबा शेलार ,विजय चौधरी ,गणेश चौधरी ,संतोष हगवणे ,सुनील हगवणे ,कैलास चौधरी ,पोपट चौधरी ,उत्तम घुले , गुलाब चौधरी, अमोल चौधरी , नितीन हगवणे , संजय कामठे ,नितीन चौधरी, भाऊसाहेब चौधरी,नवनाथ गायकवाड ,विजय चौधरी ,बाप्पू चौधरी ,योगेश चौधरी ,नंदू चौधरी, संजय चौधरी ,मुकिंदा गुळंजकर, गोरख चौधरी ,अर्जुन चौधरी, किरण गुळुंजकर ,राजेंद्र शेलार, दत्तात्रय गुळुंजकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र पवार यांनी केले .