धनकवडी, दि. 17 (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनानुसार सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आमदारांनी स्वत: हाती झाडू घेत स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.
या अंतर्गत प्रभाग क्र. 39 धनकवडी-आंबेगाव पठार येथील राजमुद्रा सोसायटी, नवरंग सोसायटी, गुलाबनगर व श्री सद्गुरू शंकर महाराज मंदिर परिसर, चैतन्यनगर, धनकवडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष अभिषेक तापकीर, महिला उपाध्यक्षा तेजश्री बदक, सरचिटणीस महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान कामठे, पुणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज नाईक तसेच इतर पदाधिकारी व सोसायटीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.