आमदारांच्या हट्टापायी पथदिव्यांची ‘दिवाळी’

पुणे – पथदिव्यांमध्ये एकसमानता असावी, असे धोरण ठरले असतानाही आमदारांच्या हट्टापायी बिबवेवाडी येथे सुशोभित पथदिवे लावण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या धोरणाला कचऱ्याची टोपली तर दाखवली आहेच; परंतु पैशांची उधळपट्टीही करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या मर्जीतल्या कंपन्यांना काम देऊन त्यांच्या पद्धतीने कामे करून घेण्याची शहरात सध्या स्पर्धाच सुरू आहे. शहरात सुशोभित पथदिवे बसवण्यात येऊ नयेत, त्यात एकसमानता असावी असे धोरण प्रशासनाने बनवले आहे. परंतु, बिबवेवाडी येथे स्थानिक आमदारांच्या आग्रहासाठी डेकोरेटिव्ह पथदिवे बसवण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने रस्ते, पदपथ, उद्याने, उड्डाणपूल यांच्यावर दिवे बसवण्यासाठी धोरण तयार केले आहे. सुशोभित पथदिवे उड्डाणपूल, उद्याने आणि ऐतिहासिक स्थळे अशा ठिकाणी लावावेत असे धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. याला महापालिका आयुक्‍तांनी मान्यता दिली आहे. या धोरणाला आमदारांनी तर हरताळ फासला आहेच; परंतु प्रशासनही स्वत:च्या धोरणाची पायमल्ली करत असल्याचेही उघड झाले आहे. या पथदिव्यांसाठी महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची खरेदी केली. काही चौकांमध्ये तर लाखो रुपये किमतीचे पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावेळी आवश्‍यकता नसताना कोठेही पथदिवे बसवण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला होता.

साध्या पथदिव्यांमुळे वीज बचत
पथदिव्यांसाठी 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च येतो. त्याचबरोबर याचे वजन देखील अधिक असते. महापालिका धोरणानुसार पथदिवे बसवल्यास निधी वाचू शकतो. त्याविषयी संबंधित विभागाने अभ्यासही केला आहे. महापालिकेच्या एकूण वापराच्या 38 टक्‍के वीजवापर हा सुशोभित पथदिव्यांवर होत आहे. महापालिकेच्या धोरणानुसार साधे पथदिवे बसवल्यास वीज बचत होतेच मात्र निधीदेखील कमी लागतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)