काही आमदारांच्या नकाराचा व्हिडीओ प्रसारीत
बंगलुरू – कर्नाटकातीाल रिसॉर्ट मध्ये ठेवण्यात आलेल्या कॉंग्रेस आमदारांना आपल्याला केवळ राज्यसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून भेटायचे आहे. आणि माझ्या मतदारांना मला भेटण्याचा अधिकार आहे असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी बंगलुरूतील ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे आज केला पण त्याचा काहीं उपयोग झाला नाही. त्यांच्या समवेत कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हेही आहेत. पण पोलिसांनी आम्हाला या आमदारांना भेटू दिले नाही असा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला असून कर्नाटकचे पोलिस गृहमंत्री अमित शहा आणि े मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या दबावा खाली आहेत असा आरोपही कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला.
दरम्यान दिग्विजयसिंह यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही फोन कॉल करण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कॉलच स्वीकारला नाहीं. एका ज्येष्ठ नेत्यांचा कॉल स्विकारण्याचे सौजन्यही येडियुरप्पांनी दाखवले नाही असा आरोप कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी केला.
दरम्यान रिसॉर्ट मध्ये ठेवण्यात आलेल्या काही आमदारांचे व्हिडीओ संदेश बाहेर प्रसारीत करण्यात आले आहेत. त्या संदेशात आम्ही दिग्विजयसिंह यांना भेटु इच्छित नाही असे या आमदारांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या मनाने येथे आले असून आम्हाला कोणीही डांबून ठवलेले नाही असेही यापैकी काही आमदारांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. हा व्हिडीओ संदेश देणाऱ्या कॉंग्रेस बंडखोर आमदारांमध्ये सुमवाली अदिलसिंह, गोविंद सिंह रजपुत, यांचा समावेश आहे.