पाचगणी – आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वतंत्र पँनेल असेल तर ते चालतंय असे उत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथील भेटीत दिले.
पदवीधर मतदारसंघाच्या जावळी तालुक्यांतील मतदान केंद्राला भेट दिल्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल टाकण्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी संकेत दिल्याबाबत विचारले असले असता शिवेंद्रराजेनी “चालतय “ असे मिश्कील उत्तर दिले. देशात लोकशाहीने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोणीही निवडणूक लढवू शकतो, असे शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांना सांगितले.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वंतत्रपणे पॅनेल टाकणार असल्याची हालचाल वरीष्ठ पातळीवरुन टाकणार असल्याची महत्वुर्ण माहीती शिंदे यांनी दिली होती. महाविकास आघाडीचा निर्णय अंमलात आणण्याचा आपला प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली होती.
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजप व महाविकास आघाडीकडून जावळी तालुक्यात मजबूत मोर्चेबांधणी करण्यात आली होती. माजी आमदार सदाशिव सपकाळ, अध्यक्ष शिवाजी देशमुख, अँड शिवाजीराव मर्ढेकर यांनी दिवसभर मतदान करुन घेतले तर भाजपाकडुन कांतीभाई देशमुख, बाळू जवळ व नगराध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते झटून काम करताना दिसत होते.