आमदार रॉय यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न

कोलकाता: पश्‍चिम बंगालमधील भाजपचे आमदार देवेंद्रनाथ रॉय हे काल त्यांच्या घराजवळ लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. तथापि त्यांनी गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यांच्या शर्टाच्या खिशात त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्यांनी आपल्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या दोन व्यक्तींची नावेही लिहिली आहेत. त्यांचा पोस्टमार्टेम रिपोर्टही आला असून त्यात त्यांना गळफास बसल्याने त्यांचा प्राण गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यांच्या शरीरावर अन्यत्र कोठेही जखमा नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत घातपात झाला आहे असा निष्कर्ष अजून तरी काढता येत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान तृणमूल कॉंग्रेसनेच त्यांची हत्या केली आहे या आरोपावर भाजप व त्यांचे कुटुंबीय अजूनही ठाम आहेत.

या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी त्यांनी केली आहे. रॉय हे हमताबाद राखीव मतदार संघातली आमदार होते. ते मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते; पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्यांनी आमदारीकाचा राजीनामा दिला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.