चिंबळी – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि चिंबळीतील अनुराग जैद यांचा राजगुरूनगर येथे सत्कार करण्यात आला. आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल तर चिंबळी येथील जैद पाटील एज्युकेशन सोसायटी व शांताई मेमोरियल स्कूललचे संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक अनुराग जैद् यांची चिंबळी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा पार पडला.
राष्ट्रीयवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने माजी सभापती विलास कातोरे, माजी अध्यक्ष अर्जून जाधव, अर्जुन अवघडे, हेमंत जैद, बाळासाहेब बर्गे, शांताई पतसंस्थेचे अध्यक्ष संजय जैद, पंडित कड, कुरुळी गावाचे माजी उपसरपंच अमित मुऱ्हे, युवा उद्योजक विशाल सोनवणे, सचिन फडके आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल चव्हाण, गणेश पाटोळे, हनुमंत कातोरे, आप्पासाहेब बटवाल, युवा उद्योजक दत्तात्रय लोखंडे, योगेश मेमाणे, बाळासाहेब जाधव, माजी अध्यक्ष हिरामण जैद, संतोष बहिरट, सत्यवान जैद, अंकुश बटवाल, अर्जून कातोरे, सुमित जाधव, जीवन बटवाल, आकाश पाटोळे, मारुती पाटारे आदि मान्यवर उपस्थित होते.