पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने शनिवार (दि.24) रोजी रात्री निधन झाले. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांच्या घरी जावून रविवार (दि.25) रोजी लांडगे परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार माधुरी मिसाळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हिराबाई लांडगे यांच्यावर रविवारी सकाळी भोसरी गावातील तळ्याकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कामगार यासह आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दिवसभर शहरासह शहराबाहेरील राजकीय मंडळींना लांडगे यांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले.