अंबरनाथ – दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार दोघे जखमी झाले आहेत. कथोरे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटोपून बदलापूरच्या दिशेने येत असताना वाहुली गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेले एक जण असे दोघेही गंभीर जखमी झाले तर आमदार कथोरे, गाडीचे चालक आणि सुरक्षारक्षक यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.