गोरगरीब जनतेसाठी काम करत राहणार – भरणे

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील गोरगरीब व उपेक्षित समाजातील जनतेमुळे मला तालुक्‍याची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. विकास करीत असताना गोरगरीब जनता हीच मी केंद्रबिंदू मानणार आहे. श्रावण बाळ योजना अनुदान व इतर योजनेतून गोरगरिबांना मदत करण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भरणेवाडी येथे (ता. इंदापूर) येथे संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना अनुदान मंजूर झासल्याची पत्रे आमदार भरणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सागर मिसाळ, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शुभम निंबाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन देवकर, किरण खुरंगे, कृष्णा गायकवाड, कालिदास राऊत, सीताराम मोरे, तानाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

भरणे म्हणाले की, गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसची असल्याने निराधार तसेच वृद्धांना मदत करण्यासाठी कदापि कमी पडणार नाही. यावेळी श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आमदार भरणे यांचा सन्मान केला. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य स्वागत सागर मिसाळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.