रामनदी पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची गरज

आमदार चंद्रकांत पाटील : मुळा-मुठा नदी विकासासाठी स्वतंत्र आराखडा

पुणे -रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीला प्राधिकरणावर निमंत्रित सदस्य करावे, अशी सूचना यावेळी केली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे शहर भाजप प्रवक्‍ते संदीप खर्डेकर, अधीक्षक अभियंता (बांधकाम) युवराज देशमुख, पुनित जोशी, वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड, शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर, डॉ. सचिन पुणेकर, सुवर्णा भांबूरकर, नयनीश देशपांडे, ज्योती पानसे, निनाद पाटील, वैशाली पाटकर, जयप्रकाश पराडकर, तुषार सरोदे उपस्थित होते.

रामनदीचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करणे आणि प्राधिकरणात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीला निमंत्रित सदस्य करण्याच्या मागणीला आयुक्‍तांनी तत्काळ मान्यता दिली.
रामनदीच्या पुनरुज्जीवनासोबतच मुळा-मुठा नदीचा विकास करण्यात येणार असून, त्यामध्ये मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण, खोलीकरण आणि विकासासाठी स्वतंत्र सतराशे कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली असून महापौर त्याचे अध्यक्ष असल्याची माहिती आयुक्‍तांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.