सदैव जनतेच्या मदतीसाठी झटणारे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव (आण्णा) तापकीर हे करोना-लॉकडाऊन जाहीर झाले, तेव्हापासून अनेक प्रकारे समाजाच्या मदतीसाठी धावून जात आहेत. अनेक प्रकारची मदतयंत्रणा राबवण्यात आमदार तापकीर यांनी पुढाकार घेत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना “करोना योद्धा’ म्हटले जात आहे.
आमदार तापकीर यांनी राबवलेल्या उपक्रमांत “डॉक्टर आपल्या दारी’ अंतर्गत 1716 नागरिकांची आरोग्य तपासणी, 11,990 नागरिकांना सॅनिटायझर वाटप, सोसायटी, ऑफिस व इतर सार्वजनिक ठिकाणी 918 सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप करण्यात आले. सोबतच 8,550 नागरिकांना मास्कवाटप, 2,835 नागरिकांना आरोग्य किट वाटपासह 153 ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. गरजू-बेघर-मजूर अशा एकूण 2092 कुटुंबांना किराणा किट वाटप सुरू आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात आमदार तापकीर यांनी आठ सामुदायिक किचनद्वारे मतदारसंघात 85 हजार 760 नागरिकांना मोफत फुड पॅकेट वाटप, 45 हजार 430 कुटुंबाला शिधावाटप व 485 नागरिकांना फेसकव्हर दिले. सात ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. यात 466 दात्यांनी रक्तदान केले. सुमारे 4,100 कार्यकर्त्यांनी सहभाग घेत मतदारसंघाज सॅनिटायझेशन केले. यात जवळजवळ 750 जेष्ठ नागरिकांचीदेखील मदत केली. आमदार तापकीर यांनी वाढदिवस साजरा न करता या उपक्रमांद्वारे सामाजिक कार्यात पुढाकार घेत आपली समाजसेवा कायम ठेवली आहे.