शिरूर – शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार उभे राहिले आहेत. वडिलांसाठी ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे प्रचार करीत होते. यावेळी एका टोळक्याने त्यांचे अपहरण केले व दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी विवस्त्र करून मारहाण केली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान, हनी ट्रॅपमधून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकृत माहिती समोर येईल. पण, या घटनेमुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.