आमदार अशोक पवार : रांजणगावात पवार यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
रांजणगाव गणपती – भाजपने शेतकऱ्यांना व कामगारांना देशोधडीला लावले आहे. शिरुर-हवेलीप्रमाणेच उर्वरित 39 गावांमधील अडचणी सोडविण्यासाठी मी कुण्याच्याही पाठीशी उभा राहणार आहे, अशी ग्वाही आमदार ऍड. अशोक पवार यांनी दिली. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार अशोक पवार यांचा नागरी सत्कार व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
३९ गावांमधील अनेक नेत्यांनी निवडणुकीसाठी मदत केली.वरिष्ठ नेत्यांच्या शेजारी बसून गद्दारी करणाऱ्यांना नेते काय करायचे ते करतील. मागील पंचवार्षिक योजनेत राबवलेल्या योजना पुन्हा राबवण्यात येतील. अष्टविनायक महामार्ग मार्गी लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
शिरुरचे विभाजन झाल्यावर भारत- पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. पक्ष अडचणीत असताना पक्षाशी गद्दारी केली. त्यांना जनता माफ करणार नसल्याचा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी लगावला. याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, विकास शिवले, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, रांजणगावचे माजी आदर्श सरपंच भिमाजी खेडकर, सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच राहूल पवार, बापू शिंदे, संदीप कुटे, श्रीकांत पाचुंदकर, ग्रामस्थ व विविध संस्थाचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.