पिंपळे -दापोडी येथील बहुतांश भागात विकासकामे संथगतीने सुरू आहेत. काही भागातील विकासकामे पूर्णत्वास गेली आहे तर काही ठिकाणी अजून कामेच सुरू झालेली नाहीत. याबाबत पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
दापोडी येथील प्रभाग क्र. 30 मधील विकासकामांची आमदार बनसोडे यांनी पाहणी केली. या वेळी माजी नगरसेविका स्वाती काटे, माजी नगरसेवक रोहित काटे, शेखर काटे उपस्थित होते. आमदार बनसोडे यांनी दापोडी परिसरातील नागरिकांच्या तसेच सोसायटीधारकांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच धार्मिक स्थळांनाही भेट दिली. सुखवानी वूड्स सोसायटी, सुखवानी गार्डन सोसायटी, मंत्री निकेतन सोसायटी, निरा सोसायटी, मंत्री हौ.कॉम्प्लेक्स सोसायटी या सर्व ठिकाणी जाऊन पूर्ण केलेली कामांची पाहणी केली. तसेच ज्या सोसायटीतील विकासकामे बाकी आहेत त्यांच्या समस्या जाणून घेत, लवकरात लवकर पुढील काम सुरू
करण्याचे आश्वसन सोसायटीधारकांना दिले.
जयभिम नगर येथील हॉली क्रॉस चर्च येथे भेट देऊन चर्चमधील विकासकामांविषयी चर्चा करून लवकरात लवकर चर्चमधील काम करण्याचे आश्वसन दिले. मंदिर यांना भेटी देऊन तेथील रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी युवा नेते रवी कांबळे, दीपक साळवे, फमिदा शेख, नागरिक उपस्थित होते.