एमके स्टॅलिन आजपासून डीएमकेचे पक्षप्रमुख 

चेन्नई:एमके स्टॅलिन हे आज पासून तामिळनाडू राज्यामधील विरोधीपक्ष द्रवीड मुनेत्रा काझगम (डीएमके) या पक्षाचे मुख्य असणार आहेत.  डीएमके पक्ष हा तामिळनाडूमधील प्रमुख दोन पक्षातील एक पक्ष आहे. एमके स्टॅलिन यांच्याकडे त्यांचे वडील करुणानिधी यांच्या निधनानंतर या पक्षाचे प्रमुख म्हणून पहिले जात होते. मागील एक वर्षांपासून तेच पक्षाचा सर्व कारभार सांभाळत होते.

करुणानिधी यांनी डीएमके पक्षाचे प्रमुख म्हणून ४९वर्षे कार्य केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा  एमके स्टॅलिन हा या पक्षाचा दुसराच पक्ष प्रमुख ठरला आहे.  डीएमकेच्या मुख्यालयाबाहेर आज बऱ्याच दिवसानंतर आनंद साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या बाहेर ढोल वाजविले गेले आणि पक्षाचे झेंडे फडकविले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करुणानिधी यांच्या निधनानंतर डीएमके पक्षाने पक्षप्रमुख निवडण्यासाठी निवडणूक जाहीर केली होती. परंतु, चेन्नई येथील पक्ष कार्यालयात फक्त एमके स्टालिन यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अन्य कोणी या पदासाठी अर्ज न दाखल केल्याने ते बिनविरोध पक्षप्रमुख म्हणून निवडले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)