आयझॉल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यातच कोरोनाशी लढा देण्यासाठी फ्रंटलाईन वर असणाऱ्या डॉक्टर, पोलीस यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांदेखील कोरोनाची लागण झपाट्याने होताना दिसत आहे. त्यातच आता मिझोरमच्या सीमा सुरक्षा दलात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिझोरममधील आणखी पाच सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली अत्यंत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या जवानांच्या संख्येनंतर राज्यतील कोरोनाबाधितांची संख्या आता २८० वर जाऊन पोहचली असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बाधित झालेले हे जवान ४२ ते ५३ या वयोगटातील असून हे सर्व जवान महाराष्ट्र, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून राज्यात आले होते. दरम्यान, हे जवान राज्यात दाखल झाल्यापासून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
राज्यात ७९ ऍक्टिव्ह केसेस उघड झाल्या असून १५९ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. २३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील निमलष्करी दलाचे ६४ तर १४४ नागरिकांचा यात समावेश आहे.