#व्हिडीओ : पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

पिंपरी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर इडीने गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. 27) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.


पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, सांगवी, नेहरूनगर, भोसरी, संत तुकाराम नगर आदी भागात स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी परिसरात फिरून व्यापाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. त्यास व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत होता. तर शहराच्या काही भागात बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचेही दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी कॅम्प परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम आणि हरीश कदम यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांना बंदचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.