मुंबई – प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पासून रिलीज झाला होता, तेव्हा पासूनच हा चित्रपट सगळीकडे चर्चेत आला होता. विनोदी मसाला ‘सर्कस’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच नाव जितकी अतरंगी आहे तितकेच यातील सर्व पात्र देखील अतरंगी आहेत. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट असून, या चित्रपटाला सिनेरसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात दिग्दर्शक रोहित शेट्टीचा कॉमेडी पॅटर्न खूप छान दाखवण्यात आला आहे. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही ‘सर्कस’ला संमिश्र प्रतिसाद दिला असून, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सरासरी कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सर्कस’ने पहिल्या दिवशी फक्त 7 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केला आहे.
दरम्यान, ‘सर्कस’ या विनोदी मसाला चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, मुरली शर्मा, सुलभा आर्य, सिद्धार्थ जाधव देखील मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.