टोकीयो : चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूंच्या साथीच्या परिणामांवर जपानची व्यावसायिक कंपनी मित्सुबिशी बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक इंधन तेलांच्या किंमती प्रभावित होऊ शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
कमी कालावधीसाठी आमच्या चीनमधील व्यवसायावर होणारा परिणम मर्यादित असेल, असे कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी काझुयुकी मासू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, आर्थिक घडामोडींवरया साथीचा काय परिणाम होतो हे आमीः पहात आहोत. त्याकडे बारकाईने लक्ष देत आहोत.
या साथीमुळे वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाला तर त्याचा परिणाम दीर्घकाळ ठरणारा असेल, त्या दृष्टीने कंपनी विचार करत आहे, असे ते म्हणाले