मिथुन चक्रवर्तीही भाजपच्या गळाला

कोलकाता – बंगाली सुपरस्टार आणि तृणमूल कॉमग्रेसचे माजी खासदार मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकात्यातील ब्रिगेड परेड क्रीडांगणावरील महारॅलीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

बंगालची विधानसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा हा पहिलाचा मोठा प्रचार कार्यक्रम होता. यावेळी दिलीप घोष आणि कैलाश विजय वर्गीय यांच्यासह पक्षाचे अनेक मातब्बर नेते उपस्थित होते.

पक्षाच्या प्रवाहात चक्रवर्ती यांचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विजय वर्गीय यांनी स्वागत केले. शनिवारी रात्री चक्रवर्ती यांनी विजय वर्गीय यांची भेट घेतली होती. या रॅलीत चक्रवर्ती सहभागी झाल्याने आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गेल्या महिन्यात मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. तेंव्हापासून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. सारदा पोन्झी घोटाळ्यात नाव आल्यानंतर चक्रवर्ती यांनी 2016 मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.