मुंबई – ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचे वडिल वसंतकुमार चक्रवर्ती यांचे मंगळवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. सध्या मिथून हे लॉकडाऊनमुळे बंगळुरू मध्ये अडकले आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत परतण्यासाठी अडचण येत आहे.
My deep condolences on the sudden demise of your father,Mithun Da.
Stay strong & may his soul rest in peace forever 🙏— Rituparna Sengupta (@RituparnaSpeaks) April 22, 2020
दरम्यान, मुंबईमध्ये मिथुन यांची आई सांतिरानी चक्रवर्ती असून मिथुन यांचा मुलगा मिमोह त्यांना धीर देत आहे. बसंत कुमार हे कलकत्ता टेलीफेन्समध्ये काम करत होते. त्यांच्या पश्चात मिथुन यांच्यासह त्यांच्या तीन बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे. बसंत कुमार यांच्या निधनामुळे चक्रवर्ती कुटुंबावर शोककळा पसरली असून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे.