नवी दिल्ली – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययानंतर सर्वाधिक गुणांच्या जोरावर अंतिम फेरी गाठलेल्या भारतीय संघाचा येत्या रविवारी विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.
भारतीय संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. देशभरातून संघाला विजेतेपदासाठी विविध प्रकारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. संघाची माजी कर्णधार मिताली राजनेदेखील अनोख्या पद्धतीने संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
#MithaliPlaysCricketInSaree
Mithali Raj believes in breaking stereotypes.
Feel proud for you❤@M_Raj03
Sky is the limit, And you proved it!!!#MithaliRaj pic.twitter.com/HvBvytRyat— Preeti Bardia(Mehta) (@PreetiBardia) March 5, 2020
मितालीने चक्क पारंपरिक साडी नेसून फलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला व त्यात तिने संघासाठी शुभेच्छा संदेश दिला आहे. जागतिक क्रिकेटला दाखवून द्या की तुम्ही विश्वकरंडक जिंकू शकता, आता करंडक भारतात घेऊनच या, असे मितालीने आपल्या संदेशात व्यक्त केले आहे.