मालीत जवान आणि जिहादींची धुमश्‍चक्री; 41 ठार

बामको: माली देशात जवान आणि जिहादींची मोठी धुमश्‍चक्री सुरू असून काल तेथे झालेल्या चकमकीत 24 जवान आणि 17 जिहादी ठार झाले. देशाच्या ईशान्येकडील भागात जिहादींचे प्राबल्य आहे. तेथे माली आणि नायगर या देशांचे लष्करी जवान संयुक्तपणे पहारा देस असताना त्यांच्या एका गटावर जिहादींनी हल्ला चढवला त्यावेळी ही चकमक झाली. या चकमकीत लष्कराची मोठी जीवित हानी झाली असली तरी त्यांनाही 17 जिहादींना कंठस्नान घालण्यात यश आले असून शंभरावर जिहादींनी त्यांना जीवंत पकडले आहे. त्यामुळे त्यांना या कारवाईत मोठे यश आल्याचे मानले जात आहे. या धुमश्‍चक्रीत अन्य 30 लष्करी जवान जखमी झाले आहेत. लष्कराने आता अधिक आक्रमकपणे त्या भागात जिहादींच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.