#MissionShakti यात तुमचे योगदान काय? धनंजय मुंडेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई -A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ आॅर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युध्द सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे, तर दुसरीकडे नरेंद्र मोदीं यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

डीआरडीओ आणि इस्रोनं उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (27 मार्च) माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यावर अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. त्यानंतर  आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी सुध्दा डीआरडीओच्या कामगिरीचे कौतुक व अभिनंदन करताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका  केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करताना म्हटले आहे की,’ DRDO ने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन’. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, ‘चौकीदार आज १५ लाख, निरव मोदी, मल्ल्या, दाऊद, राफेल यावरील मौन सोडेल असं वाटलं होतं’. वैज्ञानिकांचा अभिमान आम्हाला आहेच. पण यात तुमचे योगदान काय? ‘अंतराळत एअर स्ट्राईक केल्याचे सांगून निवडणुकींच्या तोंडावर श्रेय लाटू नका म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका देखील मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

#MissionShaktiची घोषणा करायला मोदी काय अंतराळात चाललेत का? : ममता बॅनर्जी

‘मिशन शक्ती’ : राज ठाकरेंकडून वैज्ञानिकांच अभिनंदन; तर नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Leave A Reply

Your email address will not be published.