भारताचे मिशन शक्ती; मोजक्या देशांच्या यादीत स्थान – मोदी

नवी दिल्ली  – भारतीय वैज्ञांनिकानी अंतरिक्ष क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी आज अँटीसॅटेलाईट मिसाईल (A-SAT) यशस्वीपणे लाँच केले आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले कि, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी मिशन शक्तीअंतर्गत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तीन मिनिटांमध्ये मिसाईलद्वारे भारताने उपग्रह पाडला आहे. लो अर्थ ऑर्बिटमध्ये ३०० किलोमीटर अंतरावरुन अचूक लक्ष्यभेद करण्यात यश आले आहे. भारत आज अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे. भारताने आज अंतराळात एका लाइव्ह सॅटेलाइल उदध्वस्त केला, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे मी भारतीय शास्त्रज्ञांचे आभार मानतो. या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा, तह किंवा कराराचं उल्लंघन झालेलं नाही. ही चाचणी कोणाविरुद्ध नाही तर एक संरक्षणात्मक पाऊल आहे. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात  आल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे. अँटी सॅटेलाइट मिसाइलमुळे देशावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांवर वचक ठेवणे शक्य होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.