‘मिशन मंगल’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

मुंबई – भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी (15 ऑगस्ट) ब्लॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, शर्मन जोशी, अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू,सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे ‘मिशन मंगल’ चित्रपटाला सिनेरसिकांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘मिशन मंगल’ने तब्बल 29.16 कोटी रुपयांची कमाई केली.

दरम्यान, मागील वर्ष स्वातंत्रदिनी अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 23.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर आता ‘मिशन मंगल’ने गोल्डचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. विशेष म्हणजे ‘मिशन मंगल’ चित्रपटाने मुंबई आणि म्हैसुर या दोन शहरांमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×