तुमच्या हृदयाचा ठोका चुकतोय? तर हा हार्ट रिदम डिसऑर्डर असू शकतो ! नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने पेसमेकरमध्ये आणखी सुधार करून त्याचा वापर ब्रॅडीकार्डियासारख्या आजाराच्या उपचारासाठी करता येईल. या उपचारामध्ये विविध वैशिष्ट्य् असली तरी यात रुग्णाच्या सुरक्षिततेची सुद्धा तेवढीच काळजी घेण्यात आली आहे. सध्या आपल्या येथे सिंगल आणि ड्युअल चेंबर, रेट रिस्पोन्सिव्ह आणि एमआर सेफ पेसमेकर उपलब्ध आहेत. पेसमेकर बसविणे ही कमीतकमी प्रक्रियेची सोबत उत्तम परिणाम देणारी बाब आहे.
सामान्य हृदयाचे ठोके आणि रिदमिक ठोक्यांमध्ये लगेच फरक दिसून येत नाही. ब्रॅडीकार्डिया असणाऱ्या रुग्णाच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिटाला 60 पेक्षा सुद्धा कमी असू शकतात. याची काही लक्षणे म्हणजे चक्कर येणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, व्यायाम करताना त्रास होणे आणि सिंकोप. हे रुग्ण तेव्हा अनुभवतो जेव्हा हृदयातून पाहिजे तितका रक्तसंचार बाहेर पडत नाही ज्यामुळे शरीकार्याने यातील शुगरचे प्रमाण कमी होते.
आपल्या हृदयामध्ये चार कप्पे असतात जे एका ‘इलेक्ट्रिकल’ कार्याने प्रभावित होत असतात आणि चालत असतात ज्यामुळे हृदयातील रक्तसंचार नियंत्रित ठेवला जातो. ही प्रक्रिया खूपच क्लिष्ट असते. त्यात जराही बिघाड झाला किंवा नियंत्रण विचलित झाले तर हृदयाच्या ठोक्यामध्ये बदल घडू शकतो. जसे की, ब्रॅडीकार्डियाच्या रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके सामान्य माणसांच्या हृदयाच्या ठोक्यांपेक्षा कमी असतात.
काही लोकांमध्ये हा आजार अनुवंशिक असतो, तर काहींमध्ये हा आजार लक्षणांवरून ओळखता येतो. वय, हृदयविकाराचा झटका, काही औषधे, सायनस नोडच्या यंत्रणेत बिघाड किंवा ते बंद असणे ही लक्षणे सुद्धा दिसून येतात. नाडीचे कमी ठोके, इसीजिवर तास पाहणी या सर्व बाबी लक्षात घेऊन उपचार केल्या जातो. या आजारावर कुठलेही औषध किंवा नेमका उपचार नाही म्हणूनच बहुतेक रुग्णांना पेसमेकर लावावा लागतो.
पेसमेकरमध्ये ब्रॅडीकार्डिया आजारासाठी बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहे. ते हृदयाचे ठोके कमी होण्यापासून थांबवितात. पेसमेकर हा कॉलरबोनच्या खाली अगदी छोट्याशा प्रक्रियेद्वारे बसविला जातो आणि बरेच रुग्ण या प्रक्रियेनंतर एका दिवसात घरी गेले आहेत. पेसमेकर बसविल्यावर ते “इलक्ट्रिकल इम्पल्स’सोबत काम करण्यास सुरुवात करते जेव्हा हृदयाचे ठोके कमी होतात तेव्हा हे इम्पल्स आपले कार्य करण्यास सुरुवात करतात ज्याने रुग्णाला हृदयाचे ठोके कमी झाल्यावर सुद्धा काही त्रास होत नाही.
पेसमेकरची काही वैशिष्ट्य अशी आहेत…
1. सिंगल चेंबर पेसमेकर – सगळ्यात साधे वन हॉर्ट चेंबर आहे ज्याचे ठोके निश्चित असतात.
2. ड्युअल चेंबर पेसमेकर्स – हे आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे बोथाएरियम आणि व्हेंट्रिकल साठी उपयुक्त आहे. सामान्य हृदयाच्या ठोक्यासारखेच हे पेसमेकर काम करते.
3. रेट रिस्पोन्सिव्ह पेसमेकर्स – हे पेसमेकर शरीराच्या हालचालीनुसार ठोके नियंत्रित करते. हे सिंगल किंवा डबल चेंबरचेसुद्धा असू शकतात. यामध्ये रुग्ण बऱ्याच प्रकारच्या शारीरिक हालचाली करू शकतो.
4. एमआर सेफ पेसमेकर – अगदी काही वर्षांपर्यंत पेसमेकर हे अति चुंबकीय क्षेत्रामध्ये सुरक्षित नव्हते. पण आता हे नवीन पेसमेकर अश्या परिस्थितीतसुद्धा सुरक्षित आहे.
5. लीडलेस पेसमेकर – लीडलेस पेसमेकर हे सिंगल चेम्बर पेसींगमध्ये उपलब्ध आहे. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.
डॉ. जगदीश हिरेमठ