औरंगाबाद – युट्युबवर बिंदास्त काव्या नावाने प्रसिद्ध असलेली औरंगाबादची युट्युबर तरुणी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. काव्या अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आईने औरंगाबाद पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत काव्याला २४ तासांच्या आत शोधून काढलं आहे. प्राप्त माहितीनुसार, काव्या मनमाडमधून लखनौला जात असताना रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ( Bindast Kavya Found )
युट्युबर बिंदास्त काव्या शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली होती. याबाबतची तक्रार तिच्या पालकांनी औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्थानिक पोलीस , सायबर , गुन्हे शाखा यांना या मुलीचा तात्काळ शोध घेण्य्याचे आदेश दिले. ( Bindast Kavya Found )
मुलीच्या पालकांनी दिलेले माहीती आणि सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने तपास केल्यानंतर ती महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशकडून वेगाने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती रेल्वेने प्रवास करत असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. तपास करून रेल्वे विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आल्यानंतर आरपीएफने तिला शोधून काढले.
प्राप्त माहितीनुसार, काव्या ही रेल्वेने लखनौ येथील तिच्या मित्राकडे जात होती. खुशीनगर एक्सप्रेस गाडीधून तिने खांडवा रेल्वे स्टेशन पास करून पुढे गेल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलीस तिला घेऊन औरंगाबादकडे येत आहेत. ( Bindast Kavya Found )