#ENGvPAK 1st Test : विजयाची संधी गमावली – अझर अली

मॅंचेस्टर – पहिल्या कसोटी सामन्यात भक्कम स्थिती असूनही दुसऱ्या डावात आलेल्या अपयशामुळे सामना जिंकता आला नाही, अशा शब्दात पाकिस्तानचा कर्णधार अझर अली याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर आपली निराशा बोलून दाखवली.

तसेच त्याने इंग्लंडचे खेळाडू जोस बटलर आणि ख्रिस वोक्स याचे कौतूक करताना त्यांनी आमचा विजय हिरावून घेतला असे म्हटले आहे. यजमान इंग्लंडने या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ख्रिस वोक्स हा सामन्याचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात फलंदाजीत पहिल्या व दुसऱ्या डावात अनुक्रमे 19 आणि नाबाद 84 धावा तर गोलंदाजीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान : पहिला डाव – सर्वबाद 326. इंग्लंड : पहिला डाव – सर्वबाद 219. पाकिस्तान : दुसरा डाव – सर्वबाद 169. इंग्लंड दुसरा : डाव – 82.1 षटकांत 7 बाद 277. (ज्यो रूट 42, जोस बटलर 75, ख्रिस वोक्‍स नाबाद 84, यासिर शहा 4/99).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.