मुंबई – मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लर तिच्या किलर परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. मात्र, तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. पण आता मानुषी तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावत आहे. आपली स्टायलिश अदा दाखवण्यासाठी मानुषीने घातलेल्या कपड्यांवरून सध्या ती चांगलीच ट्रोल होतीय.
मानुषी छिल्लरने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने पांढरा टॉप घातला आहे, जो खूप फाटलेला आहे अर्थात तशी स्टाईल आहे. टॉप इतका फाटलेला आहे की मानुषीने टॉपच्या आतमध्ये काय घातलेले आहे हे देखील स्पष्टपणे दिसत आहे. म्हणूनच आता नेटकऱ्यांनी तिला टीकेचे लक्ष केलं आहे.
अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. मिस वर्ल्ड ठरल्यानंतर मानुषीला बॉलीवूडमध्ये लगेच अभिनयाची संधी मिळाली होती.अनेकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या मात्र यामुळे प्रेक्षकांचा अपेक्षा भंग झाला.
चिल्लर ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मानुषीने नुकतेच तिच्या बिकिनी लूकचे फोटो इन्स्टावर शेअर केले, ज्यावर चाहत्यांनी तिला थेट गरीब म्हणून कमेंट करत हिणवल्याचे पाहायला मिळाले.