नवी दिल्ली – ‘मिस इंग्लड’ किताबाची यंदाची मानकरी भारतीय वंशाची भाषा मुखर्जी ठरलीय आहे. या स्पर्धेत भाषाने अनेक बड्या मॉडेल्सला मागे टाकत हा किताब आपल्या नावावर केला आहे.
भारतीय वंशाची २३ वर्षीय भाषा मुखर्जी जवळ दोन मेडिकलच्या पदवी आहेत. मेडिकल सायन्स तर मेडिसिन अँड सर्जरी अशा दोन पदवी आहेत. याशिवाय भाषाचे पाच वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व आहे.
दरम्यान, भाषा मुखर्जीचा जन्म भारतात झाला असून लहानपणीच ती कुटुंबियांसमवेत ब्रिटनमध्ये स्थायिक झाली. मिस इंग्लंडचा किताब पटकवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच भाषा ज्युनिअर डॉक्टर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये रुजू झाली.