नवी दिल्ली – कॉंग्रेसने उत्तरप्रदेशातील हस्तीनापुर मतदार संघासाठी प्रख्यात मॉडेल व एकेकाळची मिस बिकीनी इंडिया ठरलेली अर्चना गौतम हिला उमेदवारी दिली आहे. तिला जशी उमेदवारी जाहीर झाली तसे तिचे बिकीनी मधील फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल करून तिला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तथापि आपण असल्या प्रकारामुळे अजिबात घाबरलेलो नाही.
मी प्रियांका गांधी यांच्या घाबरू नका निर्धाराने उभ्या रहा या आवहानामुळे प्रभावित झालो आहोत असे तिने म्हटले आहे. त्यामुळे आपण हस्तीनापुरची निवडणुक निर्धाराने लढवणार आहोत असे तिने म्हटले आहे. ही 26 वर्षीय मॉडेल यानिमीत्ताने प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप आणि हिंदु महासभेच्या समर्थकांनी तिचे जुने बिकीनीतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहेत. तथापि आज पीटीआयशी बोलताना ती म्हणाली की मी अशा प्रकारांमुळे अजिबात बिथरून जाणार नाही मी निर्धाराने ही निवडणूक लढवणारच आहे.
सन 2018 साली झालेली मिस बिकीनी इंडिया स्पर्धा तिने िंजंकली होती. ती म्हणाली की या स्पर्धेचे फोटो आणि व्हिडीओ टाकून माझ्या विरोधात प्रचार सुरू झाला असला तरी हे असे होणारच हे मी आता गृहीत धरून चालले आहे. अशा परिस्थितीत मनाने भक्कम राहण्याची शिकवण आपल्याला प्रियांका गांधींमुळे मिळाली आहे असेही तिने म्हटले आहे. तिने म्हटले आहे की मी स्वता जेव्हा प्रियांका दिदिंशी या विषयी चर्चा केली