नवी दिल्ली – कुलदीप यादवला थोड्या दिवसांपुर्वी सीएटच्या वार्षीक पुरस्काराने गौरविण्यात आले होते, यावेळी बोलताना त्याने धोनी बद्दल काही विधान केले होते, या विधानाचा चुकिचा अर्थ घेऊन बातम्या पसरविण्यात आल्या असे स्पष्टिकरण कुलदीप यादवने दिले आहे.
यावेळी त्याने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसारमाध्यमांनी केवळ मसालेदार बातम्या करण्यासाठी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. परंतु या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. चाहत्यांनी या बातम्यांकडे लक्ष देऊ नये. मी धोनी बाबत असे कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. असे म्हटले आहे.