Miraj News : गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची मोठी कारवाई
गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने (Miraj News) कारवाई करत एका संशयितासह साथीदाराला अटक करत आठ लाख ९२ हजार ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Miraj News : गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने (Miraj News) कारवाई करत एका संशयितासह साथीदाराला अटक करत आठ लाख ९२ हजार ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज कार्यालयाच्या (Miraj News) पथकामार्फत हातभट्टी दारू विक्री विरोधी मोहीम सुरू असताना दि. ६ जून रोजी सायंकाळी सांगलीच्या इंदिरानगर झोपडपट्टी व संजयनगर झोपडपट्टी परिसरात छापा टाकण्यात आला.
विशाल मारुती पवार (वय २८, रा. नवीन वसाहत, उत्तर शिवाजीनगर, सांगली) याच्या घरात झडती घेतली असता गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्याच्याकडून गोवा राज्य निर्मित विदेशी दारू मद्यसाठा व मोबाइल असा एकूण १ लाख ३३ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान त्याचा साथीदार दत्तात्रय भीमराव बंडगर (रा. संजयनगर, सांगली) निष्पन्न झाल्याने त्याला दि. ८ रोजी अटक करण्यात आली. दत्तात्रय बंडगरकडून मोबाइल व प्लॅस्टिक बुचे असा एकूण ५,७८३ रपुयाचा मुद्देमाल जप्त झाला.
त्यानंतर १०० फुटी रोडवरील डी मार्ट जवळील ऑटो गॅरेजमधल पांढऱ्या रंगाच्या ट्रिबर वाहनात (एमएच ०८ एएन ८१७१) गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा २,०३,३७० रुपये प्लॅस्टिक बुचे रक्कम ५०,२९२ रुपये, पाच लाख रुपये वाहन किंमत असा एकूण ७,५३,६६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी (Miraj News) विशाल मारुती पवार, दत्तात्रय भीमराव बंडगर या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई), ८०, ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक दीपक सुपे, लक्ष्मण पोवार, अजय लोंढे, जयसिंग खुटावळे, दुय्यम निरीक्षक स्वप्निल आटपाडकर, विनायक खांडेकर, स्वप्निल कांबळे, शाहीन शेख, कविता सुपने या पथकाने ही कारवाई केली.
दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे तपास करत आहेत. अवैध हातभट्टी दारूचे सेवन करू नये तसेच गोवा बनावटीचे मद्य विक्री करणाऱ्यांची माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.





