कोलकाता : माजी जगज्जेत्या मीराबाई चानू हिने रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो गटात एकूण २०३ किलो वजन उचलून आपलाच विक्रम मोडून काढत नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
New National Record for @mirabai_chanu !
The weightlifter lifts a total of 203 kg (88 kg Snatch, 115 kg Clean & Jerk) at the National #Weightlifting Championship in Kolkata.
Many congratulations!@KirenRijiju @DGSAI @RijijuOffice @PIB_India @ddsportschannel @IndiaSports pic.twitter.com/CLblAPnQro— SAI Media (@Media_SAI) February 4, 2020
मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलले. या कामगिरीनंतर मीराबाई जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहचली आहे. तिच्याआधी क्रमवारीत चीनची जियांग हुईहुआ (२१२ किलो), हाऊ झीहुई(२११किलो) आणि कोरियाची की री सोंग गुम (२०९ किलो) अनुक्रमे पहिल्या, दुस-या व तिस-या स्थानावर आहेत.
Happy on beginning 2020 by making new national record of 203 kg and winning gold at National Weightlifting Championship in Kolkata. pic.twitter.com/9Ita6g11yq
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) February 5, 2020
यापूर्वीची तिची सर्वोत्तम कामगिरी २०१ किलो होती. तिने ही कामगिरी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नोंदवली होती. नववर्षाची सुरूवात राष्ट्रीय विक्रमासह झाल्याने मीराबाईने ट्विट करत स्वत:च्या कामगिरीबदल समाधान व्यक्त करताना आनंद झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने देखील तिचे अभिनंदन केले आहे.