लुटमार करताना अल्पवयीन मुले ताब्यात

पिंपरी – नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना केएसबी चौक, चिंचवड येथे घडली. रोहित विलास जाधव (वय 29, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घरकुल, चिखली येथील दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी जाधव हे रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अल्पवयीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधव यांनी चोरट्यांशी झटापट केली. त्यावेळी इतर नागरिकही जाधव यांच्या मदतीला आल्याने त्या दोन अल्पवयीन मुलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी समजपत्र देऊन त्या मुलांना सोडून दिले. सहाय्यक निरीक्षक अन्सार शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.