उंब्रज – कराड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या मोबाइलवर एका युवकाने वेळोवेळी मेसेज पाठवून तिला लग्न कर नाहीतर ठार मारीन, अशी धमकी दिली. वेळोवेळी तिचा पाठलाग केला. त्यामुळे त्रासास कंटाळून अल्पवयीन मुलीने विष प्राशन केले.
उपचारादरम्यान ती दि. 9 मार्च रोजी पहाटे मरण पावली. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी अमीन शिकुर इनामदार (वय18) या संशयिताला मुंबईमधून अटक केली. पोलिसांनी त्याला कराड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर संशयितास तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थ, महिलांनी उंब्रज पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे केली होती.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगीने विष प्राशन केल्यानंतर तिच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. शाळेच्या मार्गावर संशयित तिला त्रास देत होता.