फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

तरुणावर “पोक्‍सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

वाई  – सतरा वर्षीय शाळकरी मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून नंतर तिच्याशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या सादखान मुस्तफाखान पठाण (वय 26 रा. रविवार पेठ, वाई) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात “पोक्‍सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा देऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. फेसबुकच्या माध्यमातून तिची संशयित पठाण याच्याशी नोव्हेंबर 2018 मध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघे एकत्र भेटत होते. संशयिताने पीडित मुलींशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याची माहिती कोणाला दिली तर कुटुंबातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर आईने याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी पठाण याला तात्काळ अटक करून त्याच्यावर “पोक्‍सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष धुळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)