नाशिक – इन्स्टाग्रामवरील मैत्री अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडलीय. इंन्स्टाग्रामवर मैत्री आणि त्यानंतरच्या शारीरिक संबंधामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तणावात येत सर्व प्रकारची वाच्यता केली. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे. सध्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे कसे महागात पडते हे या घटनेवरून दिसून येते. दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलीसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार तरुणीला संशयित आरोपलीने इंन्स्टावर फाॅलो केले होते. त्यानंतर पुढे दोघांची मैत्री झाली. आणि कालांतराने मैत्रीचे रूपांतर कथीत प्रेमात होऊन दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दोघेही एकमेकांना अनेकवेळा भेटले. त्यावेळी तरूणाने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यामुळे मुलगी गरोदर राहिली.
मुलीला त्रास होऊ लागल्यावर ती घाबरली. भीतीने तीने सर्व प्रकार सांगितल्यावर हे प्रकरण समोर आले. यासारख्या अनेक घटना सोशल मीडियावरील मैत्रीतून घडलेल्या आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावर मैत्री करण्यापूर्वी सावधानता बाळगावी असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येते.