अभिनेत्याकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

 

पुणे : फोटो शूट करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील प्रभातरोड परिसरात घडला आहे. या संदर्भात पीडित तरुणीने  पोलिसांकडे अभिनेत्याविरुद्ध तक्रार केली असून पोलिसांनी त्याला अटक केलिओ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही व आरोपी मंदार कुलकर्णी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. मंदार याने काही मालिकांमध्ये काम केलेले आहे. तसेच तो चित्रपट, टीव्हीवरील मालिकांसाठी तरुण-तरुणींना शिफारस करत असल्याचे त्याने तरुणीला सांगितले. त्यांनंतर त्याने पीडित तरुणीला अ‍ॅडिशनसाठी घरी बोलाविले होते. १६ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता ही तरुणी त्याच्या घरी आली. मंदार याने तिला फोटोशुट करायचे आहे, असे सांगून तिचे बिकनीचे फोटो मोबाईलवर काढले. त्यानंतर ते फोटो तिला दाखवून तिच्या कपड्याचे माप घेऊन अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. तिला लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले, असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणीने डेक्कन पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पॉस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मंदार याला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.