लोणंदच्या शिवसेनेचे समस्यांबाबत मंत्र्यांना निवेदन

बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी
लोणंद (प्रतिनिधी) – लोणंदमध्ये भेडसावत असलेल्या अनेक समस्या सोडविल्या जाव्यात, यासाठी येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली.

यावेळी लोणंद नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, लोणंदची 24 बाय 7 ही योजना व अंतर्गत रस्ते, घनकचरा प्रकल्प होण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, लोणंद बसस्थानक सुशोभीकरण कॉंक्रीटीकरण व नवीन स्वच्छतागृह त्वरित बांधण्यात यावीत, अशा मागण्यांची निवेदन देण्यात आले. याआधीही शिवसेनेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडूदादा संकपाळ यांना लोणंदच्या बस स्थानकबाबतीतचा पत्रव्यवहार करण्यात आला होता.

लोणंदचे बसस्थानक हे प्रवाशांच्या सोईसाठी चांगल्या अवस्थेत उपलब्ध असावे. यासाठी लोणंद शिवसेनेच्यावतीने वारंवार पाठपुरावा केला जात आहे. आज पुन्हा परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेत याबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजित यादव, लोणंद शहरप्रमुख संदीप शेळके पाटील, उपशहर प्रमुख अविनाश नलवडे, शंभुराज भोसले आदींनी या प्रश्‍नांसाठी सकारात्मक आणि कृतिशील कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.