मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री करोनाबाधित आढळून आला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबत मंत्री शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. करोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असे राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असे त्यांनी ट्विट म्हटले आहे.
राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाची लागण झाल्याचे 2 फेब्रुवारीला समोर आले होते. याबाबत गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. त्यानंतर अनिल देशमुख करोनामुक्त होऊन नुकतेच घरी परतले आहेत.