आदिवासी जमातीचा बेंचमार्क सर्व्हे करण्याची कार्यवाही त्वरीत सुरु करावी

आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई : आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येणाऱ्या अनुसूचित जमातीचा बेंचमार्क सर्व्हे करण्याची कार्यवाही त्वरीत सुरु करावी असे निर्देश डॉ.परिणय फुके यांनी दिले.

आदिवासी जमातीचा बेंचमार्क सर्व्हे यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही.आर श्रीनिवास, आदिवासी विकास आयुक्त नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे उप सचिव श्री.ढोके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विश्लेषक अभिषेक किनिंगे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

डॉ.फुके म्हणाले की, आदिवासी जमातीचा बेंचमार्क सर्व्हे या आधी सन १९९६ मध्ये झाला होता. असे सर्वेक्षण २०-२० वर्षांच्या अंतराने आतापर्यंत दोन वेळा करण्यात आले. यंदाचे सर्वेक्षण दहा वर्षांनी होणार असून यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. सर्वेक्षणाला सुरुवात करण्याआधी सर्वेक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक व अन्वेषक यांना प्रशिक्षण देण्यात येणे आवश्यक आहे.

अनुसूचित जमातीचा विकास ही शासनाची जबाबदारी असून त्याकरिता आदिवासींचे बेंचमार्क सर्व्हेक्षण हे वेळोवेळी करणे आवश्यक आहे. यापूर्वी असा सर्व्हे सन २००९ साली झाला असून त्यानंतर सर्व्हे घेण्यात आलेला नाही. तरी चालू वर्षी अशा सर्व्हेच्या माध्यमातून आदिवासींची विविध संख्यात्मक माहिती व शासनाच्या विविध योजनांमधून आजतागायत झालेल्या आदिवासींच्या विकासाचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे. त्याकरिता बेंचमार्क सर्व्हे आवश्यक असून त्यानुसार अनुसूचित जमातीचा लोकांसाठी कोणत्या योजना आवश्यक अनावश्यक आहेत याबाबतची माहिती शासनास होईल. त्याअनुषंगाने आदिवासी जमातीसाठी नविन योजना तयार करण्यास शासनास मदत मिळून अनुसूचित जमातीसाठी वार्षिक तरतूद करण्यास मदत मिळेल असेही डॉ.फुके यांनी सांगितले.

मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे समाजकार्य विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडून सर्व्हेतून आदिवासी जमातींच्या विकासाचे नियोजन करणे, सांख्यिकी माहिती तयार करणे, आदिवासी जमातींच्या आर्थिक आणि सामाजिक सद्यस्थितीचा अभ्यास करणे, योजनांचे मॅपिंग करणे तसेच आदिवासी गावे आणि पाडे येथील भौतिक सुविधांचा अभ्यास करून संसाधन वितरण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रे निश्चित करणे असा आहे. हा सर्व्हे सद्यस्थितीतील अनुसूचित क्षेत्रात केला जाणार असून तो जनगणना स्वरूपाचा असेल. संवेदनशील असणारी सर्व्हे प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश डॉ.फुके यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.