परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूरच्या एसटी मालवाहतूकीचा घेतला आढावा …
कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोलमडलेल्या एसटीला सावरण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशी वाहतुकीप्रमाणेच माल वाहतुक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटीच्या आयुर्मान पुर्ण केलेल्या बसची अंतर्गत रचना बदलुन ट्रकमध्ये रुपांतर करण्यात आलंय. कोल्हापूर विभागातील 11 मालवाहतूक बसेस सध्या सुरू असून त्या राज्यभरात आणि राज्याबाहेर सेवा बजावत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरच्या एसटी मालवाहतूक बसची पाहणी करून आढावा घेतलाय. तसच एसटी मार्फत राज्यभरात सुरू असलेली मालवाहतूक फायदेशीर असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून एस. टी. सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे प्रती दिन २१ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. लॉकडाऊनमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनालाही पैसे नसल्याने पंचाईत झाली होती. मात्र राज्यशासनाने विविध योजनांच्या परिपूर्तीची अडीचशे कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला दिली. त्यामुळेच एप्रिल व मे महिन्याच्या वेतनाचा प्रश्न तात्पुर्ती मिटला आहे, असे असले तरी येत्या काळात एसटी महामंडळाला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार हे निश्चित होते.
उत्पन्न वाढीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महामंडळाने प्रवासी बसमध्ये अंतर्गत रचना बदलून मालवाहतूक करण्यासाठी एक कार्यप्रणाली विकसित केली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे सध्या एकूण १४,५०० परिवर्तन वाहनांचा ताफा आहे. त्यापैकी ३ हजार वाहनांनी महामंडळाच्या नियमानुसारचे दहा वर्षे आयुर्मान पूर्ण केले आहे. आयुर्मान पूर्ण केल्या बसेस अंतर्गत रचना मालवाहतुकीसाठी वापरण्याचे करण्यात आले. कोल्हापूर आगारात 11 मालवाहतूक बसेसची निर्मिती करण्यात आली असून त्या आता संपूर्ण राज्यात मालवाहतूक तर काम करत आहे राज्यातील मालवाहतूक की करणाऱ्या बसेसमध्ये कोल्हापूर आगार हे अव्वल आहे.